Friday, October 25, 2024 05:06:43 PM

Parinay Fuke On Samruddhi Mahamarg
'शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस आणणारा समृद्धी महामार्ग'

जय महाराष्ट्राच्या गाथा विदर्भाची या कार्यक्रमात विदर्भाला समृद्ध करणारा समृद्धी महामार्ग याविषयी भाजपा आमदार परिणय फुके नरेश बोरकर यांच्याशी खास बातचीत

शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस आणणारा समृद्धी महामार्ग

नागपूर : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि 'जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी'ने आयोजित केलेला "गाथा विदर्भाची: विकासाची, समृद्धीची" हा विशेष कार्यक्रम विदर्भाच्या समृद्ध इतिहासाचा गौरव करणारा ठरला.

कार्यक्रमात विदर्भाच्या विकासाच्या दिशेने विविध उपक्रमांची माहिती जनतेसमोर मांडण्यात आली. विदर्भाचा इतिहास पुराणकाळातही सापडतो, ज्यात महाभारतातील पांडवांचा अज्ञातवासही विदर्भात झाल्याचा उल्लेख आहे. या कार्यक्रमाचा उद्देश विदर्भाला समृद्धीच्या मार्गाने भारताच्या विकसनशील आलेखात स्थान मिळवून देण्यासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन जनतेसमोर याबाबतची माहिती पुरवणे होता.

'थेट, अचूक, बिनधास्त' या घोषवाक्यासह गेली अकरा वर्ष बातमीदारी करणाऱ्या 'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनीने आयोजित केलेले चर्चासत्र महत्त्वाचे ठरले. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचे विचारमंथन झाले.

विशेष पाहुणे म्हणून कपिल चंद्रयान, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार, अभिनेता भारत गणेशपुरे, सेलिब्रेटी शेफ विष्णू मनोहर, अभिनेता शिव ठाकरे, महेश मोरोणे (डेप्युटी जनरल मॅनेजर मेट्रो), दीपेन अग्रवाल (अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ इंडस्ट्री अँड ट्रेड), वीरेंद्र खरे (आर्किटेक), नरेश बोरकर (सुप्रिटेंडन्ट इंजिनियर, नागपूर मेट्रो) आणि परिणय फुके (आमदार, भाजप) उपस्थित होते.

या कार्यक्रमात भाजपा आमदार परिणय फुके म्हणाले, समृद्धी महामार्गाद्वारे विदर्भात विकासाची गंगा आणण्याची संकल्पना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होती. नागपूरला मुंबईशी जोडण्यासाठी एक सुपर एक्सप्रेस हायवे हवा त्यामुळे २० वर्षांआधी देवेंद्र फडणवीसांनी ती विधानसभेत मांडली आणि ते मुख्यमंत्री झाल्यानंतर समृद्धी महामार्गाची संकल्ना पूर्णत्वात आली. नागपूर मुंबईला जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग ही संकल्पना विकसित करण्यात आली होती असे भाजपा आमदार परिणय फुके यांनी सांगितले. 

पुढे ते म्हणाले, समृद्धी महामार्ग तयार करताना सरकारने शेतकऱ्यांना प्राधान्य दिले. शेतकऱ्यांची जमी अधिग्रहन करताना जमीनीच्या पाच पट रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली. शेतकऱ्यांना दुर्लक्षित करून हा प्रकल्प होऊ शकला नसता. शेतकऱ्यांना पाट पट रक्कम मिळाली. त्या दिवसापासूनच समृद्धी सुरू झाली असे मत आमदार परिणय फुके यांनी व्यक्त केले.   

हा कार्यक्रम विदर्भाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या योजना, प्रकल्प, आणि धोरणांची माहिती देण्यात महत्त्वपूर्ण ठरला. 'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनीने राजकारणाच्या पलीकडे जाऊन जनतेला योग्य माहिती पुरवण्याचा सकारात्मक प्रयत्न केला, ज्यामुळे विदर्भाला भारताच्या विकसनशील आलेखात स्थान मिळवून देण्यासाठी आवश्यक योगदान दिले जाईल.

या चर्चासत्राने विदर्भाच्या विकासाच्या दिशेने एक महत्त्वाची पायरी उचलली आहे, ज्यामुळे या प्रदेशातील जनतेमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल. "गाथा विदर्भाची: विकासाची, समृद्धीची" कार्यक्रम विदर्भाच्या इतिहास, संस्कृती आणि भविष्याच्या विकासाची जाणीव करून देणारा ठरला आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo