Saturday, September 28, 2024 03:54:19 PM

Pune
पावसामुळे मोदींचा पुणे दौरा रद्द

मुसळधार पाऊस पडल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारचा नियोजीत पुणे दौरा रद्द झाला

पावसामुळे मोदींचा पुणे दौरा रद्द

पुणे : मुसळधार पाऊस पडल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारचा नियोजीत पुणे दौरा रद्द झाला आहे. पंतप्रधान मोदी गुरुवारी पुण्यात २२ हजार ६०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण करणार होते. यात तीन परम रुद्र महासंगणकांचे लोकार्पण, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील दहा हजार ४०० कोटी रुपयांच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन आणि लोकार्पण तसेच सोलापूर विमानतळाचे उद्घाटन आणि बिडकीन औद्योगिक क्षेत्राचे लोकार्पण होणार होते. पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याची नवी तारीख काय असेल हे लवकरच जाहीर केले जाईल, असे सूत्रांकडून समजते. 

पंतप्रधान मोदी गुरुवारी पुण्यात येणार हे आधीच जाहीर झाले होते. पण बुधवारी पुण्याला पावसाने झोडपले. पंतप्रधान मोदी ज्या ठिकाणी जाहीर कार्यक्रम घेणार होते, त्या ठिकाणी तुफान पावसामुळे प्रचंड चिखल झाला. तसेच पावसामुळे पुण्यातले जनजीवन विस्कळीत झाले. यामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाला आहे.


सम्बन्धित सामग्री