मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरूवारपासून लाओसमधील व्हिएंनटाइनच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पंतप्रधान मोदी एकविसाव्या आसियान-भारत शिखर परिषदेत आणि एकोणिसाव्या पूर्व आशिया शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान दहाव्यांदा आसियान-भारत शिखर परिषदेत उपस्थित आहेत. पूर्व प्रथम या धोरणाची दशकपूर्ती होत असताना ही परिषद महत्त्वपूर्ण असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. भारत-प्रशांत महासागर क्षेत्रातील शांतता, स्थिरता आणि समृद्धी यांच्यावर परिषदेत विचार केला जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.