Wednesday, October 30, 2024 06:48:37 PM

PM Modi
पंतप्रधान मोदी नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात सभा घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात सभा घेणार आहे.

पंतप्रधान मोदी नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात सभा घेणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात सभा घेणार आहे. प्राथमिक वृत्तानुसार १२ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत पंप्रधान मोदी महाराष्ट्रात सात सभा घेणार आहेत.  याबाबतची अधिकृत माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल आणि मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने ४० स्टार प्रचारकांची टीम तयार केली आहे. या टीममधील मुख्य स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. पंतप्रधान मोदी राज्यात निवडक ठिकाणी सभा घेणार आहेत. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo