पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे पुणे मेट्रोचे लोकार्पण करण्यात आले. पुण्यातील पहिल्या मेट्रोला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे लोकार्पण रविवारी २९ सप्टोंबर रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्मंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यांनी मेट्रोमधून प्रवास केला.
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा मेट्रो प्रवास संध्याकाळी ४ वाजता प्रवाशांसाठी खुला होणार आहे. पुण्यातील पहिल्या मेट्रो मार्गात चार स्थानकांचा समावेश आहे. त्यामध्ये जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई, स्वारगेट या चार स्थानकांचा समावेश आहे.
पुण्यातील मेट्रो मार्गाचा प्रकल्प बहुचर्चित राहिला आहे. २६ सप्टेंबर २०२४ रोजी या मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार होते. मात्र पावसामुळे त्यांचा पुणे दौरा रद्द झाला. त्यामुळे २९ सप्टेंबर २०२४ रोजी पुणे मेट्रोचे लोकार्पण करण्यात आले.