Saturday, November 16, 2024 02:33:49 AM

Port and dock workers will get salary increase
बंदर व गोदी कामगारांना मिळणार भरघोस पगारवाढ

बंदर व गोदी कामगारांना भरघोस पगारवाढीचा करार संपन्न झाला आहे.

बंदर व गोदी कामगारांना मिळणार भरघोस पगारवाढ

मुंबई : बंदर व गोदी कामगारांना भरघोस पगारवाढीचा करार संपन्न झाला आहे. इंडियन पोर्ट असोसिएशन  व सहा मान्यताप्राप्त कामगार महासंघ यांच्यामध्ये समझोता करार झाला.  द्विपक्षीय वेतन समितीच्या बैठकीत करार झाला. सर्व बंदरांचे चेअरमन व सहा फेडरेशनच्या कामगार नेत्यांमध्ये करार झाला.द्विपक्षीय वेतन समितीचे अध्यक्ष राजीव जलोटा यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठकीत करार झाला. बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२  ते ३१ डिसेंबर २०२६ असा ५ वर्षाचा पगारवाढीचा वेतन करार करण्यात आला.  

बंदर व गोदी कामगारांना या करारातून नेमकं काय मिळालं? 

  • या वेतन करारानुसार ३१ डिसेंबर २०२१ च्या मूळ पगारात १ जानेवारी २०२२ चा ३० टक्के महागाई भत्ता विलीन कऱणार
  • त्यावर ८.५० टक्के फिटमेंट दिले जाणार
  • कामगारांना ३० टक्के घरभाडे भत्ता मिळणार
  • नोकरीत असलेल्या कामगारांना प्रति महिना ५०० रुपये विशेष भत्ता
  • तीन टक्के वार्षिक पगारवाढही मंजूर
  • एक जानेवारी २०२२ पासून सध्याच्या प्रथेनुसार प्रभावी वेतनश्रेणी तयार केल्या जाणार
  • पोर्ट वसाहतीमध्ये राहणाऱ्या कामगारांना कमीत कमी दोन हजार ८३० रूपये व जास्तीत जास्त १३ हजार ५९० रूपयांची वाढ
  • वसाहतीत न राहणाऱ्या कामगारांना किमान पाच हजार ४१० रूपये व कमाल २५ हजार ५०० रुपयांची पगारवाढ
  • निवृत्त झालेल्या कामगारांच्या निवृत्ती वेतनात किमान १ हजार १६५ तर कमाल ६ हजार ५४५ रुपये वाढ

सम्बन्धित सामग्री


jaimaharashtranews-logo