Sunday, June 30, 2024 09:15:32 AM

Monsoon Session
विधिमंडळाचे अधिवेशन, आरोपांचे सेशन

विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यांनी प्रत्युत्तर दिले. यामुळे विधिमंडळाचे अधिवेशन, आरोपांचे सेशन असे चित्र निर्माण झाले.

विधिमंडळाचे अधिवेशन आरोपांचे सेशन

मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवार २७ जूनपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या दोघांनी सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यांनी प्रत्युत्तर दिले. यामुळे विधिमंडळाचे अधिवेशन, आरोपांचे सेशन असे चित्र निर्माण झाले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक धुमश्चक्री रंगली. महालक्ष्मी रेसकोर्स पुनर्विकास योजनेवरून शिउबाठाच्या आदित्य ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केले. एका विकासकाला फायदा मिळवून देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. हा आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी फेटाळून लावला. 

मुंबईत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन
गुरुवार, २७ जून ते शुक्रवार,  १२ जुलै २०२४ दरम्यान अधिवेशन
राज्याचा अर्थसंकल्प २८ जून सादर होणार
अर्थसंकल्प दोन्ही सभागृहात सादर होणार
अर्थमंत्री अजित पवार सादर करणार अर्थसंकल्प

पावसाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार?

शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा
मराठा आणि ओबीसी आरक्षण 
आमदार निधीवाटप 
पुणे ड्रग्ज प्रकरण
पोर्शे अपघात
नीट घोटाळ्याचे महाराष्ट्र कनेक्शन
महागाई आणि बेरोजगारी
पोलीस भरती
शक्तिपीठ महामार्ग
भ्रष्टाचाराची प्रकरणं

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काय म्हणाले ?

विरोधीपक्ष जातीय तेढ निर्माण करतायत - अजित पवार
विरोधी पक्ष खोटं बोलतोय - अजित पवार
मनुस्मृतीला समर्थन नाही - अजित पवार
कोणतंही अधिवेशन गुंडाळलं नाही - अजित पवार
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे - अजित पवार

खोटं बोल पण, रेटून बोल हीच विरोधकांची मानसिकता - फडणवीस
विरोधकांनो, आरशात आपला चेहरा पाहा - फडणवीस
विदर्भातल्या प्रकल्पांना चालना आम्ही दिली - फडणवीस
नळपाणी योजनेत मराठवाडा वॉटरग्रीडचा समावेश असावा - फडणवीस
विरोधकांची फॅक्टरी खोटं पसरवण्याची  - फडणवीस
हिंमत असेल तर, सभागृहात बोला - फडणवीस

विरोधकांना चर्चा नकोय - शिंदे
राज्यघटना बदलण्याचा प्रचार खोटा - शिंदे
विरोधकांची अवस्था, गिरे तो भी टांग उपर - शिंदे
अठ्ठेचाळीस हजार कोटीची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई - शिंदे


सम्बन्धित सामग्री