Monday, July 01, 2024 01:15:15 AM

Beed
व्हायरल ऑडियोवरून पेटलं राजकारण

भाजपाच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. या पराभवाला शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख कारणीभूत असल्याचे वृत्त येत आहे.

व्हायरल ऑडियोवरून पेटलं राजकारण

बीड : भाजपाच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. या पराभवाला शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख कारणीभूत असल्याचे वृत्त येत आहे. यामुळे बीडमध्ये मुंडे समर्थक विरुद्ध शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असे चित्र निर्माण झाले आहे.

एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमधील आवाज बीडमधील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खाडे यांचा असल्याचे वृत्त आहे. क्लिपमध्ये बोलणारी व्यक्ती बीडमध्ये मतदान फिरवलं, पहिल्यांदा पंकजा मुंडे यांच्या विरोधात काम केलं अशा स्वरुपाची वक्तव्य केल्याचे ऐकू येत आहे. ही क्लिप व्हायरल होताच बीड जिल्ह्यात मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत. मुंडे समर्थकांनी बीडमध्ये कुंडलिक खाडेंचं कार्यालय फोडले आहे.

बीडमध्ये कुंडलिक खाडेंचं कार्यालय फोडलं 
ऑडिओ क्लिप व्हायरल होताच मुंडे समर्थक आक्रमक
शिंदे समर्थक कुंडलिक खांडेंनी बीडमध्ये मतदान फिरवलं 
जिल्हाप्रमुखांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल

        

सम्बन्धित सामग्री