Monday, September 09, 2024 02:25:27 PM

Ladki Bahin Yojana
'लाडकी बहीण'वरुन विरोधकांची चिडचिड

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे विरोधकांची चिडचिड सुरू झाली आहे.

लाडकी बहीणवरुन विरोधकांची चिडचिड 

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे विरोधकांची चिडचिड सुरू झाली आहे. उद्धव यांच्या पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे दोन महिनेच मिळतील असा दावा केला. राऊतांच्या या वक्तव्याचा भाजपा नेते नितेश राणे यांची समाचार घेतला. 

नियमानुसार सरकारच्या कल्याणकारी योजना आचारसंहिता लागू असतानाही सुरू ठेवल्या जातात. या योजनांबाबतचे निर्णय निवडणूक आयोगाच्या परवानगीने घेण्याचे बंधन लागू होते. यामुळे राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली तरी कल्याणकारी योजना बंद पडण्याचा धोका नाही, असेही भाजपाकडून सांगण्यात आले. तर योजना जाहीर करतानाच राज्य शासनाने आर्थिक नियोजन केलेल आहे. यामुळे योजना सुरू राहील, असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

विधानसभेची निवडणूक

महाराष्ट्रात २०१९ मध्ये २१ ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले आणि २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात आली. यामुळे यंदा म्हणजेच २०२४ मध्ये ऑक्टोबर महिन्यात राज्यात मतदान होण्याची शक्यता आहे. 


सम्बन्धित सामग्री