Monday, September 16, 2024 10:14:35 AM

Jaydeep Apte
पुतळा प्रकरण, पाटील आणि आपटेला पोलीस कोठडी

शिवरायांच्या पुतळा प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्थापत्य सल्लागार चेतन पाटील या दोघांना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पुतळा प्रकरण पाटील आणि आपटेला पोलीस कोठडी

कल्याण : शिवरायांच्या पुतळा प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्थापत्य सल्लागार चेतन पाटील या दोघांना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

जयदीप आपटेला अटक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा पडल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याला पोलिसांनी अटक केले आहे. घटना घडली तेव्हापासून जयदीप फरार होता. तो कल्याण येथे नातलगांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केले. अटक केल्यानंतर जयदीपला मालवण पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पुतळा प्रकरणात शिल्पकार जयदीप आपटे आणि स्थापत्य सल्लागार चेतन पाटील या दोघांना मालवण पोलिसांनी न्यायालयात हजर केले. चेतनला काही दिवसांपूर्वी न्यायालयाने अटक केले. तर जयदीपचा ताबा ठाणे जिल्हा पोलिसांकडून मालवण पोलीस ठाण्याला मिळाला. 

  1. मालवण शिवराय पुतळा प्रकरण 
  2. आपटेला मालवण पोलीस ठाण्यात आणले
  3. आपटेसह चेतन पाटीलला न्यायालयात हजर करणार

फरार आपटे कसा पोलिसांच्या ताब्यात आला ?

  1. २६ ऑगस्टपासून फरार असलेला शिल्पकार आपटे अटकेत 
  2. बुधवारी रात्री कुटुंबियांना भेटण्यासाठी आपटे तोंडाला रुमाल बांधून कल्याणच्या घरी आला
  3. घराबाहेर असलेल्या पोलिसांकडून रात्री ९.३० ते १०.०० वाजण्याच्या दरम्यान आपटे अटकेत 
  4. कल्याण पोलिसांकडून जयदीप आपटेचा ताबा सिंधुदुर्ग पोलिसांकडे 
  5. आपटेने पोलिसांना सहकार्य करायचं ठरवलंय, आपटेच्या वकिलांचा दावा

सम्बन्धित सामग्री