Thursday, September 19, 2024 01:26:15 PM

PM Narendra Modi
पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ते २३ सप्टेंबर या कालावधीत अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते अमेरिका दौऱ्यात क्वाडच्या बैठकीत सहभागी होतील तसेच क्वाडच्या राष्ट्रप्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.

पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ते २३ सप्टेंबर या कालावधीत अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते अमेरिका दौऱ्यात क्वाडच्या बैठकीत सहभागी होतील तसेच क्वाडच्या राष्ट्रप्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. मोदी २२ सप्टेंबर २०२४ रोजी न्यूयॉर्कमध्ये असतील. पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यात नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना भेटण्याची शक्यता आहे. मोदी २३ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या भविष्याचा वेध घेणाऱ्या शिखर परिषदेत सहभागी होतील तसेच निवडक राष्ट्रप्रमुखांसोबत चर्चा करतील.

नरेंद्र मोदी अमेरिकेत असतील त्याच सुमारास नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली अमेरिकेच्या दौऱ्यावर असतील. यामुळे न्यूयॉर्कमध्ये मोदी - ओली यांच्यात चर्चा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट २०१४, नोव्हेंबर २०१४, मे २०१८, मे २०२२ असा चार वेळा नेपाळचा दौरा केला आहे.

  1. २१ सप्टेंबर २०२४ - क्वाड शिखर परिषद (चौथी क्वाड शिखर परिषद) आणि क्वाड देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत द्विपक्षीय चर्चा
  2. २२ सप्टेंबर २०२४ - न्यूयॉर्कमध्ये भारतीयांशी संवाद, निवडक उद्योजकांसोबत संवाद
  3. २३ सप्टेंबर २०२४ - संयुक्त राष्ट्रांच्या भविष्याचा वेध घेणाऱ्या शिखर परिषदेत (समिट ऑफ द फ्युचर) सहभागी होणार, निवडक राष्ट्रप्रमुखांसोबत चर्चा

भारतात होणार क्वाडची शिखर परिषद

भारतात २०२५ मध्ये क्वाडची शिखर परिषद होणार आहे. या परिषदेचे यजमानपद भारताकडे असेल.


सम्बन्धित सामग्री