Tuesday, December 03, 2024 10:59:15 PM

Narendra Modi
एकता दिनानिमित्त मोदी अहमदाबादेत, सरदार पटेलांना अभिवादन

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला भेट दिली.

एकता दिनानिमित्त मोदी अहमदाबादेत सरदार पटेलांना अभिवादन

अहमदाबाद : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला भेट दिली. सरदार पटेलांना अभिवादन केले. एकता दिनाच्या कवायतीची आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पंतप्रधान मोदींनी पाहणी केली. यानंतर पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना एकतेची शपथ दिली. 

'स्टॅच्यू ऑफ युनिटी' येथे झालेल्या कवायतीत भारतासह एकूण १६ देशांच्या लष्करी तुकड्या सहभागी झाल्या. जवानांनी चित्तथरारक कसरती केल्या. भारताच्या वायुदलाने आकाशातून सरदार पटेलांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करत 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला सलामी दिली. 

सरदार पटेलांनी साडेपाचशेपेक्षा जास्त संस्थानांना भारतात विलीन केले. तसेच देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलली. गुजरातमध्ये शेतकऱ्यांना संघटीत करुन सहकार तत्वावर दुधाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरणा दिली. देशाच्या एकतेसाठी आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी अखेरच्या श्वासापर्यंत सरदार वल्लभभाई पटेल झटत राहिले. त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे; असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo