Monday, September 16, 2024 10:25:35 AM

Narendra Modi
'सिंगापूरने काशीमध्ये गुंतवणूक करावी'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूर दौऱ्यात तिथल्या व्यावसायिकांशी चर्चा केली. याप्रसंगी पंतप्रधान मोदींनी व्यावसायिकांना काशीत अर्थात वाराणसीत गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

सिंगापूरने काशीमध्ये गुंतवणूक करावी

सिंगापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूर दौऱ्यात तिथल्या व्यावसायिकांशी चर्चा केली. याप्रसंगी पंतप्रधान मोदींनी व्यावसायिकांना काशीत अर्थात वाराणसीत गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. भारतात साठ वर्षांनंतर पहिल्यांदाच दुर्मिळ घटना घडली आहे. सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी एका व्यक्तीला पंतप्रधानपदी काम करण्याची संधी देशवासियांनी दिली आहे. ही संधी मिळाली आहे आधीच्या दोन कार्यकाळात केलेल्या कामाच्या जोरावर लोकांचा विश्वास जिंकला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. भारताला जगाचं देखभाल केंद्र बनायचं आहे. यासाठी विमान वाहतूक, सेमी कंडक्टर निर्मिती अशा वेगवेगळ्या क्षेत्रात भारत देशाविदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करू इच्छितो, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. भारताचा भर कौशल्य विकासावर असल्याचे त्यांनी सांगितले. भारत २०३० पर्यंत ५०० गीगावॅट जैविक ऊर्जेची निर्मिती करण्याचे लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवून काम करत असल्याचेही पंतप्रधान मोदींनी सांगितले. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान भारत आणि सिंगापूर यांच्यात सेमीकंडक्टर, औद्योगिक निर्मिती, डिजिटल तंत्रज्ञान, आरोग्य, कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये सहकार्याचे, प्रशिक्षणाचे आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाचे करार झाले. 


सम्बन्धित सामग्री