Thursday, September 12, 2024 05:40:01 PM

PM Modi
पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावर मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २१ ऑगस्टपासून पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. ते माजी पंतप्रधान दिवंगत मोरारजी देसाई यांच्यानंतर पोलंडला जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.

पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावर मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २१ ऑगस्टपासून पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. ते माजी पंतप्रधान दिवंगत मोरारजी देसाई यांच्यानंतर पोलंडला जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि मोरारजी देसाई यांच्यानंतर मोदी हे पोलंडला जाणारे भारताचे चौथे पंतप्रधान आहेत. मोरारजी देसाई १९७९ मध्ये पोलंडला गेले होते. यानंतर ऑगस्ट २०२४ मध्ये मोदी पोलंडला जात आहेत. 

भारत आणि पोलंड यांच्यात सुमारे सहा अब्ज डॉलरचा आंतरराष्ट्रीय व्यापार आहे. भारत पोलंडला प्रामुख्याने चहा, कॉफी, मसाले, कापड, कपडे, औषधे, रसायने, आधुनिक यंत्रे आणि उपकरणे, वाहनांचे सुटे भाग आणि शस्त्रक्रियेची साधने यांची निर्यात करतो. पोलंडमधून भारत यंत्र, प्लॅस्टिकचे साहित्य, लोखंड, यांत्रिक उपकरणे, संरक्षणाशी संबंधित उपकरणे यांची आयात करतो. टीसीएस, विप्रो टेक, झेन्सार टेक, व्हिडीओकॉन या भारतीय कंपन्या पोलंडमध्ये व्यवसाय करत आहेत. भारत आणि पोलंड यांच्यात २०१९ पासून थेट विमानसेवा सुरू झाली आहे. यामुळे मोदींच्या दौऱ्यानंतर भारत आणि पोलंड यांच्यातील आंतरराष्ट्रीय व्यापार वाढण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री