महाराष्ट्र : रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्लॅटफॉर्म तिकीट 8 दिवस बंद असणार आहे. महापरिनिर्वाण दिनामुळे पुढील काही दिवस रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ शकते यामुळे मध्य रेल्वेकडून काही महत्वाच्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये व खबरदारीच्या उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
याआधीदेखील मध्य रेल्वेने दिवाळीच्या काळात काही दिवस महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट बंद केले होते. याचा गर्दी नियंत्रणात फायदा झाल्याचे दिसून आले होते. याच पार्शवभूमीवर आता महापरिनिर्वाण दिनामुळे पुढील काही दिवस रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ शकते यामुळे मध्य रेल्वेकडून काही महत्वाच्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणत्या प्लॅटफॉर्मवर तिकीट असणार बंद?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि कल्याण.
भुसावळ विभागः बडनेरा,अकोला, नांदुरा, मूर्तिजापूर, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक.
नागपूर विभाग : नागपूर आणि वर्धा
पुणे विभाग : पुणे रेल्वे स्थानक
सोलापूर विभाग : सोलापूर रेल्वे स्थानक
ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्या लोकांना या निबंधांमधून सूट देण्यात आली आहे. प्रवाशांनी या कालावधीत सुरळीत आणि सुरक्षित प्रवासासाठी योग्य नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे, असे आवाहन देखील मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. दरम्यान प्लॅटफॉर्म तिकीट 8 दिवस बंद राहणार असून गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. महापरिनिर्वाण दिनामुळे पुढील काही दिवस रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ शकते
यामुळे मध्य रेल्वेकडून काही महत्वाच्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट बंद ठेवण्यात आले आहे.