नवी दिल्ली : संसदेत १३ डिसेंबर २०२३ रोजी घुसखोरी झाली होती. या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने पुरवणी आरोपपत्र सादर केले. पुढील सुनावणी पतियाळा हाऊस न्यायालयात २ ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे.
दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी संसदेत घुसखोरी करणाऱ्यांविरोधात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करुन खटला चालवण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी या निर्देशांचे पालन करत दोषींविरोधात गुन्ह्यांची नोंद केली आहे.
पोलिसांनी मनोरंजन डी, ललित झा, अमोल शिंदे, महेश कुमावत, सागर शर्मा, नीलम आझाद या सहा आरोपींविरोधात सात जून रोजी एक हजार पानांचे आरोपपत्र सादर केले. राज्यपालांच्या निर्देशांनुसार आरोपींविरोधात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोपींविरोधात खटला चालवण्यासाठी पोलिसांनी आवश्यक ती माहिती न्यायालयाला सादर केली आहे.