Thursday, September 05, 2024 11:15:30 AM

Paris 2024 Olympics
कधी सुरू होणार पॅरिस ऑलिम्पिक, कुठे बघता येणार ?

फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे ३३ वे उन्हाळी ऑलिम्पिक होणार आहे.

कधी सुरू होणार पॅरिस ऑलिम्पिक कुठे बघता येणार

पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे ३३ वे उन्हाळी ऑलिम्पिक होणार आहे. ही स्पर्धा २४ जुलै २०२४ पासून सुरू होत आहे. पॅरिस ऑलिम्पिकचा समारोप ११ ऑगस्ट २०२४ रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार ऑलिम्पिकचा समारोप १२ ऑगस्ट रोजी होत आहे. यंदा ऑलिम्पिक २४ जुलै रोजी सुरू होत असले तरी उद्घाटनाचा सोहळा २६ जुलै रोजी होणार आहे. स्पोर्ट्स १८ या क्रीडा वाहिनीवर आणि जिओ सिनेमा या मोबाईल अॅपवर ऑलिम्पिकचे थेट प्रक्षेपण बघता येईल. भारत आणि फ्रान्सच्या वेळेत साडेतीन तासांचा फरक आहे. पॅरिसमध्ये सकाळचे ६.११ वाजले असतील तर दिल्लीत सकाळचे ९.४१ वाजले असतात. वेळेचे हे गणित लक्षात ठेवून क्रीडाप्रेमी ऑलिम्पिकच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद घेऊ शकतील. भारतीय वेळेनुसार शुक्रवार २६ जुलै रोजी रात्री ११.३० वाजता पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटनाचा सोहळा होणार आहे.

फ्रान्समध्ये होत असलेल्या यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतासह २०६ देशांचे दहा हजार ७१४ क्रीडापटू सहभागी होणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ३२ खेळांच्या ३२९ वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य अशी सात पदके जिंकली होती. टोकियो ऑलिम्पिकच्या पदक तक्त्यात भारताने ४८ वे स्थान पटकावले होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ११७ खेळाडूंचा चमू भारताकडून खेळणार आहे. भालाफेक करणारा नीरज चोप्रा, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, पुरुष हॉकी संघ, भारोत्तोलक साइखोम मीराबाई चानू पदके जिंकतील; अशी आशा भारताला आहे. भारत १६ खेळांमध्ये सहभागी होणार आहे. यात वेगवेगळ्या प्रकारचे अॅथलेटिक्स, धनुष्यबाण, बॅडमिंटन, मुष्टीयुद्ध अर्थात बॉक्सिंग, अश्वारुढ स्पर्धा, हॉकी, ज्युडो, रोइंग, सेलिंग, नेमबाजी, पोहणे, टेबलटेनिस, भारोत्तोलन (वजन उचलणे) आणि कुस्ती यांचा समावेश आहे. 

पॅरिस ऑलिम्पिकची उलटी मोजणी सुरू
रात्री अकरानंतर होणार उद्घाटन
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ३२ खेळांच्या ३२९ वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा
जगातील २०६ देशांचे दहा हजार ७१४ क्रीडापटू
भारताचे ११७ खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये
भारताचे ६९ खेळाडू पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या मैदानात
यात २९ अॅथलीट, २१ नेमबाज, १९ हॉकीपटू यांचा समावेश
भारत १६ खेळांमध्ये सहभागी होणार

भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य अशी सात पदके जिंकली
भालाफेक करणारा नीरज चोप्रा, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, पुरुष हॉकी संघ, भारोत्तोलक साइखोम मीराबाई चानू पदके जिंकतील; भारताला आशा

स्पोर्ट्स १८ - १ वर इंग्रजीत प्रसारण, भाषा बटणावर तामिळ आणि तेलुगू हे दोन पर्याय
स्पोर्ट्स १८ - २ वर प्रामुख्याने हिंदी प्रसारण
स्पोर्ट्स १८ - ३ वर ग्लोबल अॅक्शन फीड


सम्बन्धित सामग्री