पालघर : भररस्त्यात भांडण झाले आणि प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. ही धक्कादायक घटना पालघर तालुक्यातील मुरबे परिसरात घडली. या प्रकरणात हत्या करणाऱ्याला बोईसर पोलिसांनी अटक केली. प्रेयसीचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.