Thursday, September 19, 2024 07:51:21 PM

Lebanon
लेबेनॉनमध्ये मंगळवारी पेजर, बुधवारी वॉकीटॉकीत स्फोट

लेबेनॉनमध्ये मंगळवारी पेजरचे आणि बुधवारी वॉकीटॉकींचे ठिकठिकाणी स्फोट झाले. या स्फोटांमध्ये हजारो जखमी झाले.

लेबेनॉनमध्ये मंगळवारी पेजर बुधवारी वॉकीटॉकीत स्फोट

बैरुत : लेबेनॉनमध्ये मंगळवारी पेजरचे आणि बुधवारी वॉकीटॉकींचे ठिकठिकाणी स्फोट झाले. या स्फोटांमध्ये हजारो जखमी झाले. पेजर स्फोट मालिकेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आणि २८०० पेक्षा जास्त जखमी झाले. तर वॉकीटॉकी स्फोट मालिकेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आणि १०० जखमी झाले.

जखमींमध्ये हिजबुल्लाचे अनेक अतिरेकी आहेत. हिजबुल्लाचे अतिरेकी एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी पेजर, वॉकीटॉकी या यंत्रांचा वापर करतात. यामुळे या स्फोटांचा सर्वाधिक फटका हिजबुल्लाच्या अतिरेक्यांना बसला. लेबेनॉनमध्ये मंगळवारी पेजर स्फोट मालिकेत इराणचे लेबेनॉनमधील राजदूत मोजीतबा अमानी हे पण जखमी झाले आहेत. 

हिजबुल्ला या अतिरेकी संघटनेवर अमेरिका आणि युरोपियन युनियनने बंदी घातली आहे. पण इराणच्या पाठिंब्याच्या जोरावर हिजबुल्ला लेबेनॉनमध्ये राज्य करत आहे. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात ऑक्टोबर २०२३ पासून लढाई सुरू आहे. या लढाईत पेजर आणि वॉकीटॉकींच्या स्फोटांमुळे हिजबुल्लाची पिछेहाट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

कसा झाला पेजरचा स्फोट ?

हिजबुल्ला या अतिरेकी संघटनेसाठी युरोपमधील एका कंपनीने पेजरची निर्मिती केली होती. या पेजरमध्ये मर्यादीत प्रमाणात स्फोटके भरण्यात आली. ही स्फोटके कोणत्याही सेन्सरमध्ये डिटेक्ट होणार नाहीत अशी खबरदारी घेण्यात आली. तसेच पेजरच्या यंत्रातही बदल करण्यात आला. पेजरची यंत्रणा हॅक करण्यात आली. यानंतर विशिष्ट यांत्रिक सूचना देऊन पेजरमध्ये स्फोट करण्यात आले. पेजरमध्ये लिथियम बॅटरी असते. स्फोट झाला त्यावेळी बॅटरीतील लिथियम पेजर वापरणाऱ्यांसाठी जास्त धोकादायक ठरले. 

पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटांचे परिणाम

पेजर स्फोटांमुळे अनेकांना कंबरेजवळ तसेच कंबरेखाली जखमा झाल्या आहेत. वॉकीटॉकी स्फोटांमुळे अनेकांना हाताला, पोटाला तसेच कंबरेजवळच्या भागाला जखमा झाल्या आहेत.


सम्बन्धित सामग्री