Thursday, September 19, 2024 01:24:01 PM

Lebanon
लेबेनॉनमध्ये पेजरचे स्फोट, इराणचे राजदूत जखमी

लेबेनॉनमध्ये ठिकठिकाणी पेजरचे स्फोट झाले. या स्फोटांमध्ये अडीच हजारांपेक्षा जास्त जखमी झाले. जखमींमध्ये इराणचे लेबेनॉनमधील राजदूत आहेत.

लेबेनॉनमध्ये पेजरचे स्फोट इराणचे राजदूत जखमी

बैरुत : लेबेनॉनमध्ये ठिकठिकाणी पेजरचे स्फोट झाले. या स्फोटांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आणि अडीच हजारांपेक्षा जास्त जखमी झाले. जखमींमध्ये इराणचे लेबेनॉनमधील राजदूत मोजीतबा अमानी तसेच हिजबुल्लाचे अनेक अतिरेकी आहेत. हिजबुल्लाचे अतिरेकी एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी पेजरचा उपयोग करत होते. यामुळे पेजर स्फोटांचा सर्वाधिक फटका हिजबुल्लाच्या अतिरेक्यांना बसला. लेबेनॉनमध्ये अवघ्या काही मिनिटांत जवळपास एक हजार पेजरचा स्फोट झाला.

हिजबुल्ला या अतिरेकी संघटनेवर अमेरिका आणि युरोपियन युनियनने बंदी घातली आहे. पण इराणच्या पाठिंब्याच्या जोरावर हिजबुल्ला लेबेनॉनमध्ये राज्य करत आहे. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात ऑक्टोबर २०२३ पासून लढाई सुरू आहे. या लढाईत पेजरच्या स्फोटांमुळे हिजबुल्लाची पिछेहाट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

कसा झाला पेजरचा स्फोट ?

तंत्रज्ञानाचा वापर करुन पेजरची यंत्रणा हॅक करण्यात आली. यानंतर निवडक पेजरचे तापमान वाढेल अशी व्यवस्था विशिष्ट यांत्रिक सूचना देऊन करण्यात आली. यामुळे सुमारे एक हजार पेजरचे तापमान वाढले आणि पेजरमधील लिथियमच्या बॅटऱ्यांचा स्फोट झाला.


सम्बन्धित सामग्री