Tuesday, July 02, 2024 09:26:56 AM

orange loss unseasonal rain
कोटींची संत्री मातीमोल

मार्च आणि एप्रिल महिन्यात अमरावती जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचे नुकसानाचे पंचनामे आता आटोपले आहेत. यामध्ये सर्वाधिक १३७ कोटींचे नुकसान संत्रा पिकाचे झालेले आहे, असे दिसून येत आहे.

कोटींची संत्री मातीमोल
orange loss

अमरावती, १२ मे २०२४, प्रतिनिधी : मार्च आणि एप्रिल महिन्यात अमरावती जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचे नुकसानाचे पंचनामे आता आटोपले आहेत. यामध्ये सर्वाधिक १३७ कोटींच्या संत्रा पिकाचे नुकसान झालेले आहे, असे दिसून येत आहे. 
अमरावती जिल्ह्यात मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे खूप नुकसान झाले आहे. पंचनाम्यानुसार या आपत्तीमध्ये ६४ हजार शेतकऱ्यांच्या ४५ हजार हेक्टरमधील रब्बी, भाजीपाला आणि फळपिकांचे १५५ कोटींचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा अहवाल आहे. २० हजार शेतकऱ्यांच्या ६६५६ हेक्टरमधील बागायती पिकांचे १७.९७ कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. याशिवाय ४४७३९ शेतकऱ्यांच्या ३८ हजार हेक्टरमधील फळपिकांचे १३६.६८ कोटींचे नुकसान झालेले आहे. या आपत्तीमध्ये एकूण ६४७४८ शेतकऱ्यांच्या ४४६५० हेक्टरमधील पिकांचे १५४.७८ कोटींचे नुकसान झालेले आहे. नुकसान भरपाई संदर्भात अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 


सम्बन्धित सामग्री