मुंबई : तृतीयपंथींना सन्मानाने आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी केईएमच्या युरोलॉजी विभागांतर्गत आता विशेष ओपीडी सुरू करण्यात येणार आहे. सप्टेंबर महिन्यापासून या ओपीडीला सुरुवात करण्यात येणार असून, दर शनिवारी ही ओपीडी असेल. केईएम आणि 'सखी चार चौकी' या एनजीओच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जाणार आहे.