Sunday, April 06, 2025 06:13:27 AM

नाशकात कांदा उत्पादकांना दिलासा

कांदा उत्पादक शेतकरी हा नेहमीच चिंतेत असतो. मात्र आता नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नाशकात कांदा उत्पादकांना दिलासा

नाशिक: कांदा उत्पादक शेतकरी हा नेहमीच चिंतेत असतो. मात्र आता नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. श्रीलंका सरकारकडून कांदा आयात शुल्कात घट करण्यात आली आहे. 30 टक्क्यावरुन आयात शुल्क 10 टक्के करण्यात आले असल्याने नाशकात कांदा उत्पादक शेतकरी सुखावला आहे. श्रीलंका सरकारकडून कांदा आयात शुल्कात घट करण्यात आली असून 30 टक्क्यावरुन आयात शुल्क 10 टक्के करण्यात आल्याने  कांद्याची निर्यात वाढणार आहे. आणि याचा मोठा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्याला होणार आहे. 

देशातून श्रीलंकेत केवळ 9 टक्के कांद्याची निर्यात होते. मात्र निर्यात शुल्क आकारात असल्यामुळे निर्यात मंदावली होती. अखेर श्रीलंका सरकारने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेत 30 रुपये शुल्कावरून 10 रुपये केल्याने भारतीय कांद्याची आवक वाढणार आहे. दरम्यान निर्यात दर रद्द करण्याची मागणी उत्पादकांची असून  कांद्यावर केंद्राकडून 20 टक्के निर्यात दर ठेवण्यात आला आहे. 

श्रीलंकेतील ग्राहकांसाठी दररोज 25 ते 30 हजार कांदा बॅगची आवश्यकता भासते. त्यातच श्रीलंका सरकारकडून कांदा आयात शुल्कात घट करण्यात आल्याने याचा मोठा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. सद्यस्थितीत श्रीलंकेत श्रीलंकन चलनाप्रमाणे 300 रुपये प्रति किलो कांदा दर आहेत. त्यामुळे भारतीय कांद्याला देखील चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हि आनंदाची बातमी असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. 


सम्बन्धित सामग्री