Thursday, November 21, 2024 01:00:22 PM

Omar Abdullah
ओमर अब्दुल्ला 'कलम ३७०' नसतानाचे पहिले मुख्यमंत्री

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी १६ ऑक्टोबर २०२४ रोजी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

ओमर अब्दुल्ला कलम ३७० नसतानाचे पहिले मुख्यमंत्री

श्रीनगर : नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी १६ ऑक्टोबर २०२४ रोजी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पुनर्रचना करुन केंद्रशासित केलेल्या जम्मू काश्मीरचे ते पहिले मुख्यमंत्री झाले. श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे शपथविधी झाला. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांना शपथ दिली. कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरचे नेतृत्व करणारे ओमर अब्दुल्ला हे पहिले मुख्यमंत्री आहेत. 

केंद्र सरकारशी समन्वय राखून राज्याच्या सुरक्षेसाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याला प्राधान्य देणार, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले. ओमर अब्दुल्ला यांनी आधी २००९ ते २०१४ या काळात जम्मू काश्मीरचे नेतृत्व केले होते. आता पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व करत आहेत. 

जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स ९० पैकी ४२ जागांवर विजयी झाली तर काँग्रेसने सहा जागांवर विजय मिळवला. भाजपाने जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत २९ जागांवर विजय मिळवला. यामुळे भाजपा जम्मू काश्मीरमध्ये मुख्य विरोधी पक्ष झाला आहे. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo