Sunday, June 30, 2024 08:39:28 AM

OM Birla
ओम बिर्ला लोकसभेचे सभापती

भाजपाचे ओम बिर्ला सलग दुसऱ्यांदा लोकसभेचे सभापती झाले. त्यांची आवाजी मतदानाने सभापतीपदी निवड झाली.

ओम बिर्ला लोकसभेचे सभापती

नवी दिल्ली : भाजपाचे ओम बिर्ला सलग दुसऱ्यांदा लोकसभेचे सभापती झाले. त्यांची आवाजी मतदानाने सभापतीपदी निवड झाली. 

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

  1. ओम बिर्ला यांची सभापतीपदी निवड
  2. आवाजी मतदानाने बिर्ला यांची निवड
  3. ओम बिर्ला १८व्या लोकसभेचे नवे सभापती
  4. सलग दुसऱ्यांदा सभापतीपदी बिर्लांची निवड
  5. लोकसभा सभापतीपदी ओम बिर्ला विराजमान
  6. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बिर्लांचं अभिनंदन

काय म्हणाले राहुल गांधी ?

  1. 'विरोधकांना बोलण्याची आणि प्रश्न मांडण्याची संधी मिळावी'
  2. राहुल गांधी यांची ओम बिर्लांकडे मागणी

कोण आहेत ओम बिर्ला ?

राजकीय कारकीर्द

  1. कोटा दक्षिणमधून २००३ मध्ये पहिली विधानसभा निवडणूक लढवली
  2. काँग्रेसच्या शांती धारीवाल यांच्याविरुद्ध १०,१०१ मतांनी विजय मिळवला
  3. काँग्रेसच्या राम किशन वर्मा २००८ मध्ये विरुद्ध २४ हजार ३०० मतांनी विजयी 
  4. तिसरी विधानसभा निवडणुकीत पंकज मेहता यांचा ५० हजार मतांनी पराभव 
  5. राजस्थान सरकारमध्ये संसदीय सचिव 
  6. सामाजिक न्याय, ऊर्जा, सल्लागार समितीचे स्थायी समिती सदस्य 
  7. ओम बिर्ला यांना १९ जून २०१९ रोजी १७ व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं 

पक्षीय जबाबदारी

  1. जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा, कोटा. (१९८७-९१)
  2. प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा, राजस्थान राज्य. (१९९१-१९९७)
  3. राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा. (१९९७-२००३)
  4. कोटा दक्षिणचे आमदार (२००३ -२०१५)
  5. कोटा येथील खासदार (२०१४-सध्या)
  6. उपाध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ लिमिटेड
  7. अध्यक्ष, सीओएनएफईडी, जयपूर. (जून १९९२ ते जून १९९५)
  8. लोकसभा सभापती, (१९ जून २०१९ पासून)

ओम बिर्ला - पहिला कार्यकाळ, १९ जून २०१९ ते ५ जून २०२४ आणि दुसरा कार्यकाळ २६ जून २०२४ पासून सुरू

दोन कार्यकाळ असलेले लोकसभा सभापती

  1. जीएमसी बालयोगी - २४ मार्च १९९८ ते १९ ऑक्टोबर १९९९ आणि २२ ऑक्टोबर १९९९ ते ३ मार्च २००२
  2. बलराख जाखड - २२ जानेवारी १९८० ते १५ जानेवारी १९८५ आणि १६ जानेवारी १९८५ ते १८ डिसेंबर १९८९
  3. नीलम संजीव रेड्डी - १७ मार्च १९६७ ते १९ जुलै १९६९ आणि २६ मार्च १९७७ ते १३ जुलै १९७७
  4. गुरुदयाल सिंह धिल्लन - ८ ऑगस्ट १९६९ ते १७ मार्च १९७१ आणि २२ मार्च १९७१ ते १ डिसेंबर १९७५
  5. एमए अय्यंगार - ८ मार्च १९५६ ते १० मे १९५७ आणि ११ मे १९५७ ते १६ एप्रिल १९६२

सम्बन्धित सामग्री