ओमान : ओमानजवळ समुद्रात तेलवाहक जहाज बुडले. जहाज बुडत असल्याची माहिती मिळताच जवळ असलेल्या भारतीय नौदलाच्या तेग या नौकेने मदत केली. आतापर्यंत नऊ जणांना वाचवण्यात आले आहे. यात आठ भारतीय आणि एक श्रीलंकेचा नागरिक आहे. बेपत्ता असलेल्या सात जणांचा शोध सुरू आहे. यात पाच भारतीय आणि दोन श्रीलंकेचे नागरिक आहेत. बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्यासाठी जहाज बुडले त्या परिसरात पी - आठ आय या समुद्रात टेहळणी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विमानाचीही मदत घेतली जात आहे. बुडलेल्या जहाजावर आफ्रिका खंडातील कोमोरोस या देशाचा झेंडा होता. कोमोरोस हा आफ्रिका खंडातील तिसरा सर्वांत छोटा देश आहे.
ओमानजवळ समुद्रात बुडले तेलवाहक जहाज
जहाजावरील १६ कर्मचाऱ्यांपैकी ९ जणांना वाचवले
बेपत्ता असलेल्या ७ जणांचा समुद्रात शोध सुरू
भारतीय नौदलाने सुरू केली शोध मोहीम
वाचवलेल्यांमध्ये ८ भारतीय आणि १ श्रीलंकेचा नागरिक
बेपत्ता असलेल्यांमध्ये ५ भारतीय आणि २ श्रीलंकेचे नागरिक