नवी मुंबई : पनवेल ग्रामपंचायतीची धुरा सांभाळणाऱ्या सरपंच व उपसरपंचाच्या मानधनात शासनाने दुप्पट वाढ केली आहे. आता सरपंचांना १० हजार रुपयांपर्यंत मानधन मिळणार आहे. याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याचा लाभ राज्यातील हजारो ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांना मिळणार आहे. सरपंच व उपसरपंचांना अतिशय कमी मानधन दिले जात होते. त्यामुळे मानधनात वाढ करावी, अशी मागणी राज्यभरातील सरपंच संघटनांकडून केली जात होती. गावाचा कारभार हाकणारे सरपंच, उपसरपंच यांचे मानधन वाढावे म्हणून कित्येक वर्षापासून ही मागणी केली जात होती.