Friday, June 28, 2024 08:40:02 PM

Thane
ठाण्यात पाणीपुरवठा बंद

ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्ती कामांमुळे शुक्रवारी सकाळी अकरा वाजल्यापासून शनिवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

ठाण्यात पाणीपुरवठा बंद

ठाणे : ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्ती कामांमुळे शुक्रवारी सकाळी अकरा वाजल्यापासून शनिवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. घोडबंदर रोड, साकेत नवीन पाइपलाइन येथील पाणीपुरवठा  बंद राहणार आहे. शुक्रवारी २१ जून रोजी सकाळी अकरा ते रात्री अकरा या बारा तासांच्या कालावधीत घोडबंदर रोड, साकेत नवीन पाइपलाइन येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर, शुक्रवारी २१ जून रोजी रात्री अकरा ते शनिवारी २२ जून रोजी सकाळी अकरा या काळात ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, समता नगर, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, मुंबा आणि कळव्याचा काही भाग येथे बारा तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या काळात, पिसे उदंचन केंद्र, टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्च दाब सब स्टेशनमधील कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, फिल्टर बेड वॉल्व्ह दुरुस्ती आदी कामे करण्यात येणार आहेत. यामुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.


सम्बन्धित सामग्री