पनवेल : पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, करंजाडे आणि काळुंद्रे यांसह अनेक नोड्सचा पाणीपुरवठा २६ मे रोजी सकाळी ९ ते २७ मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जलशुद्धीकरण केंद्राच्या जलवाहिनीच्या आणि वीज पुरवठ्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा २८ मे रोजी सकाळी पूर्ववत होईल.