Court
Edited Image, प्रतिकात्मक प्रतिमा
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने अलीकडेच एका महिलेची अपील फेटाळून लावली, जिने तिच्या पतीला घटस्फोट देण्याची परवानगी देणाऱ्या कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. महिलेने तिच्या पतीवर मानसिक क्रूरता केल्याच्या आधारावर न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायमूर्ती विवेक रुशिया आणि गजेंद्र सिंह यांच्या खंडपीठाने या प्रकरणात महिलेवर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी केली, ज्यात म्हटले आहे की, ती तिच्या पुरुष मित्रांसोबत तिच्या वैयक्तिक आणि लैंगिक जीवनाबद्दल अश्लील गप्पा मारत असे. न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले की, लग्नानंतर पती-पत्नीला त्यांच्या मित्रांशी बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु हे संभाषण आदरयुक्त आणि सभ्य असले पाहिजे, विशेषतः जेव्हा ते विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीसोबत बोलत असेल.
संभाषण सन्माननीय आणि सभ्य असले पाहिजे -
दरम्यान, न्यायालयाने म्हटले आहे की, कोणत्याही पतीला त्याची पत्नी मोबाईलवर अशा अश्लील चॅटिंग करत असल्याचे सहन करता येणार नाही. लग्नानंतर पती-पत्नीला मित्रांशी बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु हे संभाषण सन्माननीय आणि सभ्य असले पाहिजे, जेणेकरून जोडीदाराला कोणताही आक्षेप नसेल. जर जोडीदाराकडून वारंवार आक्षेप घेतल्यानंतरही अशा कृती सुरू राहिल्या तर ते मानसिक क्रूरता ठरेल आणि घटस्फोटाचे कारण ठरू शकते.
हेही वाचा - Anorexia Nervosa: कसंबसं 24 किलो वजन.. तरीही वजन घटवण्याचा अट्टाहास.. वेडेपणापायी किशोरवयीन मुलीने जीव गमावला!
काय आहे नेमकं प्रकरण ?
या जोडप्याचे लग्न 2018 मध्ये झाले होते. पती अंशतः बहिरा होता आणि ही वस्तुस्थिती लग्नापूर्वी महिलेला सांगितली गेली होती. तथापि, पतीने आरोप केला आहे की, लग्नानंतर लगेचच त्याच्या पत्नीने त्याच्या आईशी वाईट वागायला सुरुवात केली आणि लग्नाच्या दीड महिन्यातच ती सासरच्या घरातून निघून गेली. तसेच पतीने असाही आरोप केला आहे की लग्नानंतरही महिला तिच्या जुन्या प्रियकरांशी मोबाईलवर बोलत असे आणि व्हॉट्सअॅपवर अश्लील संदेश पाठवत असे. पतीने या चॅट्सचे प्रिंटआउट्सही न्यायालयासमोर सादर केले.
हेही वाचा - लग्नाच्या रिसेप्शनला येताना 'या' 2 भेटवस्तू आणू नका! तेजस्वी सूर्याचे पाहुण्यांना आवाहन; कोणत्या आहेत या वस्तू? जाणून घ्या
सुनावणीदरम्यान न्यायालयाचा नोंदवले महत्त्वपूर्ण निरीक्षण -
तथापि, पत्नीने असा दावा केला की तिचे तिच्या कोणत्याही पुरुष मित्राशी असे संबंध नव्हते. तिने असेही म्हटले आहे की तिच्या पतीने तिचा मोबाईल हॅक केला आणि पुरावे तयार करण्यासाठी स्वतः बनावट मेसेज पाठवले. याशिवाय, तिने तिच्या पतीवर 25 लाख रुपये हुंडा मागितल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोपही केला. तथापि, न्यायालयाने पत्नीचे युक्तिवाद कमकुवत मानले, कारण महिलेच्या वडिलांनी स्वतः कबूल केले की, त्यांच्या मुलीला पुरुष मित्रांशी बोलण्याची सवय होती.
दरम्यान, न्यायालयाने म्हटले की, महिलेचे वडील स्वतः 40 ते 50 वर्षांपासून वकिली करत आहेत, परंतु त्यांनी त्यांच्या वक्तव्याला न्यायालयात आव्हान दिले नाही. न्यायालयासमोर सादर केलेल्या चॅटिंगच्या प्रिंटआउट्सवरून हे संभाषण योग्य नव्हते हे देखील दिसून येते. याशिवाय, महिलेने तिच्या पतीविरुद्ध यापूर्वी घरगुती हिंसाचाराचा कोणताही गुन्हा दाखल केला नाही, ज्यामुळे पतीचे आरोप बरोबर असल्याचे सिद्ध होते, असं न्यायालयाने म्हटलं आहे. तथापी, न्यायालयाने कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आणि घटस्फोट मंजूर करत महिलेचे अपील फेटाळले.