Sunday, June 30, 2024 09:28:21 AM

Maharashtra
मंत्रिमंडळाचा विस्तार नाहीच

महायुतीतील इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.

मंत्रिमंडळाचा विस्तार नाहीच

मुंबई : महायुतीतील इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार हवा होता. तर भाजपाच्या नेत्यांचा या विस्ताराला विरोध होता. यामुळे विस्तार कधी होणार आणि कोणाला किती मंत्रिपदे मिळणार यावरून चर्चेला उधाण आले होते. ही चर्चा सुरू असतानाच मंत्रिमंडळाचा विस्तार अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.

मंत्रिमंडळाचा विस्तार अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडण्याची प्रमुख कारणे

  1. विस्तार झाल्यास समसमान मंत्रिपदाचे वाटप करण्याची शिवसेना आणि राष्ट्रवादीची मागणी
  2. अवघ्या १२ मंत्रिपदाचे वाटप करताना प्रत्येकी ४ मंत्रिपदे वाट्याला येणार 
  3. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत भाजपामधील आमदारांची संख्या अडीच पट अधिक 
  4. परिणामी विस्तार झालाच तर भाजपाला अंतर्गत नाराजीचा फटका अधिक बसण्याची शक्यता 
  5. विस्ताराच्या आशेने अनेक नेते अद्याप पक्षात काम करतायत, त्यांचे नाव न घेतल्यास बंडखोरीची भीती 
  6. लवकरच विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता
  7. अशा परिस्थितीत प्रत्येक आमदार आपापल्या मतदारसंघात राहणे उचित समजतो
  8. परिणामी विस्तार झालाच तरी त्याचा सरकार किंवा जनतेला तितकासा फायदा नाही

सम्बन्धित सामग्री