मुंबई : भाजपा नेते नितेश राणे नेहमी त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आताही त्यांनी काही वक्तव्याने केली आहेत. वाकड्या नजरेनं पाहिलात तर वेचून वेचून मारू असे वक्तव्य त्यांनी केले आहे. तुमच्या मिरवणुकीतून एकही जण सुखरुप घरी जाणार नाही असे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. या वक्तव्यातून त्यांनी मुस्लिमांवर निशाणा साधला आहे.