Sunday, June 30, 2024 09:29:18 AM

Nilesh Lanke
लंकेंनी इंग्रजीतून घेतली शपथ

नगरचे खासदार नीलेश लंके यांनी मंगळवारी लोकसभेत इंग्रजीतून शपथ घेतली.

लंकेंनी इंग्रजीतून घेतली शपथ

नवी दिल्ली : नगरचे खासदार नीलेश लंके यांनी मंगळवारी लोकसभेत इंग्रजीतून शपथ घेतली. या शपथेचे बुरुडगाव मार्गावरील लंकेंच्या कार्यालयाबाहेर मोठ्या पडद्यावर (मोठ्या स्क्रीनवर) थेट प्रक्षेपण बघण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ही व्यवस्था लंकेंच्या समर्थकांनीच केली होती. नीलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. फटाके फोडून आनंद साजरा केला. याआधी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू असताना महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लंके यांना संसदेत इंग्रजीतून भाषण करण्याचे आव्हान दिले होते. 

यावेळी लोकसभेत महाराष्ट्रातील अनेकांनी मराठी भाषेत खासदारकीची (सदस्यत्वाची) शपथ घेतली. पण राजकीय प्रचारावेळी मिळालेल्या आव्हानाला उत्तर म्हणून लंकेंनी इंग्रजी भाषेत शपथ घेतली. 


सम्बन्धित सामग्री