Sunday, November 24, 2024 09:49:40 PM

Nilesh Lanke
'राज्यात मविआचीच सत्ता येणार'

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार, असे 'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत राशप खासदार निलेश लंके म्हणाले.

राज्यात मविआचीच सत्ता येणार

मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार, असे 'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत राशप खासदार निलेश लंके म्हणाले. 

काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी नागरिकांना खटाखट पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. या विषयावर बोलताना खासदार निलेश लंके यांनी बचावात्मक पवित्रा घेतला. सत्तेत येण्याआधी प्रत्येक पक्ष वेगवेगळी आश्वासने देतो. ही आश्वासने पूर्ण करण्यासाठी सत्तेत येणे आवश्यक असते. मविआ राज्यात आणि केंद्रात सत्तेत नाही. यामुळे त्यांनी दिलेली आश्वासने सध्या पूर्ण करणे शक्य नाही, असे खासदार निलेश लंके म्हणाले. 

निलेश लंके मुलाखतीत काय म्हणाले ?

माझ्या विजयाने शरद पवार आनंदी - लंके 
माझी राजकीय पार्श्वभूमी नाही - लंके 
सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकारणात आलो - लंके
परिवर्तनात सामान्य नागरिकांचा मोठा वाटा - लंके
निवडणुकीतल्या चुकांसाठी दिलगिरी व्यक्त केली - लंके
मतदार प्रलोभनाला बळी पडत नाहीत - लंके
सरकार आलं असतं तर वचन पूर्ण केले असते - लंके
विरोधी आघाडीचं सरकार आलंच नाही - लंके
पक्षादेशाने लोकसभा निवणूक लढलो - लंके 
शरद पवारांना दिलेला शब्द पाळला - लंके 
उद्धव सरकार असतानाच माझी उमेदवारी निश्चित - लंके
राजकारणात पराभव स्वीकारता आला पाहिजे - लंके
विखेंनी पराभवानंतर मंथन करावे - लंके
कोरोना काळातल्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं - लंके
कोरोना काळात आरोग्य मंदिर चालवले - लंके 
कोरोना काळातल्या कामासाठी शरद पवारांची मदत - लंके
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अग्रेसर राहणार - लंके 
संसदेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार - लंके


सम्बन्धित सामग्री





jaimaharashtranews-logo