Thursday, September 19, 2024 12:48:22 AM

Noise Pollution, NGT, Ganeshotsav 2024
ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी ‘एनजीटी‘चे गणेश मंडळांना आदेश

पुण्यातील श्रवणतज्ञ डॉ. कल्याणी मांडके यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या माध्यमातून राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने आदेश देत गणेश मंडळांना आवाजाची मर्यादा पाळण्याचे आदेश दिले आहेत.

ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी ‘एनजीटी‘चे गणेश मंडळांना आदेश

ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी ‘एनजीटी‘चे गणेश मंडळांना आदेश

पुणे : पुण्यातील श्रवणतज्ञ डॉ. कल्याणी मांडके यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या माध्यमातून राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने आदेश देत गणेश मंडळांना आवाजाची मर्यादा पाळण्याचे आदेश दिले आहेत. सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत लाऊड स्पीकर आणि पारंपारिक वाद्याला परवानगी आहे. परंतु या वेळेमध्ये अमर्यादित आवाजामध्ये हे सगळे वाद्य वाजवल्याने मोठ्या प्रमाणामध्ये त्रास उद्भवत असून, यावर मर्यादा म्हणून आता प्रत्येक मंडळाला दोन ठिकाणी डिजिटल बोर्ड तयार करून त्यावर आवाज मर्यादा आणि मोठ्या आवाजामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचे फलक लावणे बंधनकारक केले आहे. तसेच ढोल ताशा पथकामध्ये तीसच वादक असावेत. असे देखील आदेश दिले असून, असे न झाल्यास पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी असे देखील एनजीटीने स्पष्ट केले आहे. 


सम्बन्धित सामग्री