Sunday, September 08, 2024 10:20:41 AM

Ajit Pawar
'वित्त विभागाच्या आक्षेपाची बातमी खोटी'

लाडकी बहीण योजना सर्व अनुमतीनंतरच अर्थसंकल्पात मांडली गेली. अर्थ विभागाचा लाडकी बहीणला विरोध असल्याचा प्रचार खोटा आहे, असे प्रसिद्धीपत्रक अजित पवारांनी काढले.

वित्त विभागाच्या आक्षेपाची बातमी खोटी

मुंबई : लाडकी बहीण योजना सर्व अनुमतीनंतरच अर्थसंकल्पात मांडली गेली. अर्थ विभागाचा लाडकी बहीणला विरोध असल्याचा प्रचार खोटा आहे. लाडकी बहीण योजनेसाठी ३५ हजार कोटी रुपयांची संपूर्ण तरतूद केलेली आहे. तरतूद केलेली रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे. राजकीय हेतूनं प्रेरित अपप्रचार थांबवा, या शब्दात अपप्रचार करणाऱ्यांना सुनावणारे प्रसिद्धीपत्रक राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काढले आहे. 

'वित्त विभागाच्या आक्षेपाची बातमी खोटी'
अर्थमंत्री अजित पवार यांचं विधान 
प्रसिद्धीपत्रकातून मांडली भूमिका  


सम्बन्धित सामग्री