Friday, March 21, 2025 10:26:19 PM

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे नवे वेळापत्रक

राज्य सरकारच्या विविध विभागातील ५२४ रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ रविवार २१ जुलै २०२४ रोजी घेण्यात येणार

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे नवे वेळापत्रक

मुंबई : राज्य सरकारच्या विविध विभागातील ५२४ रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ रविवार २१ जुलै २०२४ रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा आयोगाकडून गुरुवार ३० मे २०२४ रोजी करण्यात आली आहे.

अराखीव किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास, अशा उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा उपलब्ध करून देण्याचा तसेच सदर प्रवर्गातून नव्याने पात्र ठरलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता रविवार २१ जुलै २०२४ रोजी परीक्षा होणार आहे. 

आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ परीक्षेकरीता मूळ जाहिरातीस अनुसरून अर्जाद्वारे फक्त अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा करण्याकरीता विकल्प सादर करणे तसेच अराखीव (खुला) मधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरीता वयाधिक ठरल्याने अर्ज सादर  करू शकले नाहीत, अशा इतर मागासवर्गातील उमेदवारांकरीता अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक ३१ मे, २०२४ ते दिनांक ७ जून, २०२४ असा आहे. 


सम्बन्धित सामग्री