Monday, September 09, 2024 04:04:39 PM

New FASTag rules
देशभर फास्टॅगसाठी नवे नियम

देशभर गुरुवार १ ऑगस्टपासून फास्टॅगसाठी नवे नियम लागू झाले. 'नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'ने नवे नियम लागू केले.

देशभर फास्टॅगसाठी नवे नियम

नवी दिल्ली : देशभर गुरुवार १ ऑगस्टपासून फास्टॅगसाठी नवे नियम लागू झाले. 'नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'ने नवे नियम लागू केले. नियमांचे पालन केले तर टोलनाक्यावर वाहनांचा वेळ वाया जाणार नाही. फास्टॅगद्वारे झटपट टोल भरुन वाहन टोल नाका ओलांडू शकेल.

नवे नियम

  1. तीन वर्ष जुना फास्टॅग असल्यास नव्याने केवायसी बंधनकारक
  2. फास्टॅगसाठी ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत केवायसी करणे बंधनकारक
  3. पाच वर्ष जुना फास्टॅग असल्यास नव्याने घ्यावा लागणार
  4. वाहन नोंदणी क्रमांक आणि चेसिस क्रमांक फास्टॅगशी जोडण्याचे बंधन
  5. नवीन वाहन खरेदी केल्यानंतर ९० दिवसांच्या आत नोंदणी क्रमांक अपडेट करणे बंधनकारक
  6. वाहनाचे पुढील आणि बाजूचे स्पष्ट फोटो अपलोड करणे बंधनकारक
  7. फास्टॅग मोबाईल क्रमांकाशी लिंक करणे बंधनकारक
  8. फास्टॅग पुरवठादारांना त्यांच्या डेटाबेसची पडताळणी करावी लागेल
     

सम्बन्धित सामग्री