नवी दिल्ली : भारतानं पारतंत्र्याच्या खुणा पुसण्याचं काम हाती घेतलं आहे. भारतीय दंडसंहिता रद्द करुन देशात न्यायसंहिता लागू करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या नेतृत्वात देशात न्यायसंहिता लागू झाली. आता भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयाद्वारे त्यांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी काढली. भारतीय न्यायदेवतेच्या मूर्तीचं रुप बदललं.
आधी भारतात न्यायदेवतेच्या डोळ्यांवर काळी पट्टी होती. न्यायदेवतेच्या एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात संविधानाची प्रत होती. आता न्यायदेवतेच्या डोळ्यांवर काळी पट्टी नसेल. एका हाती तराजू आणि दुसऱ्या हाती संविधानाची प्रत कायम ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिलेल्या आदेशानंतर न्यायदेवतेची नवी मूर्ती तयार करण्यात आली. ही मूर्ती न्यायधीशांच्या ग्रंथालयाबाहेर सहज दिसेल अशा पद्धतीने ठेवण्यात आली आहे.
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी काढली
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा ऐतिहासिक निर्णय
भारतीय न्यायदेवतेच्या मूर्तीचं रुप बदललं