Monday, August 05, 2024 08:17:47 AM

Nepal
नेपाळमध्ये सत्तांतर, ओली होणार पंतप्रधान

नेपाळमध्ये सत्तांतर झाले आहे. पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांचा संसदेत पराभव झाला.

नेपाळमध्ये सत्तांतर ओली होणार पंतप्रधान

काठमांडू : नेपाळमध्ये सत्तांतर झाले आहे. पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांचा संसदेत पराभव झाला. दहल सरकारने संसदेत सादर केलेला विश्वासदर्शक ठराव पडला. पराभव झाल्यामुळे दहल यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. 

काही दिवसांपूर्वी कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ - युनिफाइड मार्क्सवादी लेनिनवादीने दहल सरकारचा पाठिंबा काढून घेतला. यानंतर पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी संसदेत विश्वासदर्शक ठराव सादर केला. हा ठराव पडल्यानंतर दहल यांनी राजीनामा दिला. दहल यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा ओली यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन होणार असल्याची चर्चा नेपाळच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

नेपाळच्या प्रतिनिधी सभेत २७५ सदस्य आहेत. पण दहल सरकारला विश्वासदर्शक ठरावावरील मतदानावेळी फक्त ६३ मते मिळाली. विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात १९४ मते पडली. यामुळे दहल यांचे सरकार पडले. 


सम्बन्धित सामग्री