Sunday, June 30, 2024 08:55:42 AM

Narendra Modi
मोदींच्या नेतृत्वात रालोआचा सत्तास्थापनेचा दावा

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रालोआने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन रालोआच्या नेत्यांनी सत्तास्थापनेचा औपचारिक दावा केला.

मोदींच्या नेतृत्वात रालोआचा सत्तास्थापनेचा दावा

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रालोआने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन रालोआच्या नेत्यांनी सत्तास्थापनेचा औपचारिक दावा केला. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा रविवार ९ जून २०२४ रोजी संध्याकाळी सहा वाजता विशेष सोहळ्यात पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे. याआधी २०१४ आणि २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. देशात १९६२ नंतर पंतप्रधानपदाची हॅटट्रिक करणारे मोदी हे पहिलेच नेते ठरणार आहेत. 

याआधी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर रालोआने एक बैठक घेतली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांची भाजपाचे नेते आणि रालोआचे नेते या दोन्ही पदांवर निवड झाली. जुन्या संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात रालोआची शुक्रवारी दुसरी बैठक झाली. या बैठकीत रालोआतील घटकपक्षांनी एकमताने मोदींची पंतप्रधानपदासाठी निवड केली. यानंतर नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. ज्येष्ठ नेत्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर मोदींनी देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर नरेंद्र मोदी रालोआच्या नेत्यांसह राष्ट्रपतींच्या भेटीला गेले. या भेटीत सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. 
 

राष्ट्रपतींकडून मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रालोआचे नेते नरेंद्र मोदी यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले आहे. नरेंद्र मोदी रविवार ९ जून २०२४ रोजी संध्याकाळी सहा वाजता पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. 


सम्बन्धित सामग्री