नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस मंत्रिपदासाठी प्रतीक्षेत आहेत. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे पद मिळणार नसल्यास सध्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही पण रालोआसोबत आहोत आणि राहणार, असे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले आहे. याआधी मनमोहन सिंह सरकारच्या काळात प्रफुल्ल पटेल हे नागरी विमान वाहतूक खात्याचे स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री होते. यामुळे त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार मिळवण्यास इच्छुक होते. पण सध्याच्या राजकीय परिस्थितीत रालोआने त्यांना एक राज्यमंत्री पद देण्याची तयारी दाखवली होती. यानंतर राष्ट्रवादीने मंत्रिपदासाठी वाट बघणार असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस, अध्यक्ष अजित पवार
राज्यसभा सदस्य (१) : प्रफुल्ल पटेल
लोकसभा सदस्य (१) : सुनील तटकरे
केंद्रीय मंत्रिमंडळात शून्य सदस्य