Thursday, November 21, 2024 02:37:11 PM

Navratri Fast
नवरात्रीचे उपवास करताय ? जाणून घ्या; काय खावे

नवरात्रौत्सवात सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. घटस्थापनेपासून हिंदू धर्मातील शारदीय नवरात्र सुरू होते. या काळात देवीची पूजा करतात. नवरात्रीचे नऊ दिवस पूजा करतात. या काळात उपवास केला जातो.

नवरात्रीचे उपवास करताय  जाणून घ्या काय खावे

मुंबई : नवरात्रौत्सवात सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. घटस्थापनेपासून हिंदू धर्मातील शारदीय नवरात्र सुरू होते. या काळात देवीची पूजा करतात. नवरात्रीचे नऊ दिवस पूजा करतात. या काळात उपवास केला जातो. नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काळ म्हणून ओळखला जातो. यामुळे आपल्यात नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. नवरात्रीत रंगांचे देखील विशेष महत्व आहे. नवरात्रीच्या नऊ रंगांपैकी प्रत्येक रंग देवीच्या एका विशिष्ट गुणाचे प्रतीक आहे . रंगाप्रमाणे उपवासाचेही विशेष महत्व आहे. अनेक महिला नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतात. 

उपवासाला काय खावे? 

१) उपवासाला फळं, फळांचा रस आहारात घ्या, यामुळे शरीराला ताकद मिळेल. 
२) उपवासाला राजगिरा खाऊ शकतो, राजगिऱ्यात कॅल्शियम असते राजगिरा खाल्ल्यानंतर पटकन भूक लागत नाही. 
३) उपवासाला ताक प्यावे.  
४) लिंबू पाणी, कोकम सरबत घेऊ शकतात .

उपवास करण्याचे अनेक फायदे आहेत. उपवास केल्याने  डिटॉक्सिफिकेशन, कॅलरी कंट्रोल , मानसिक शांतता, अध्यात्मिक शांतता मिळते. आजारी असाल किंवा काही दिवसांपूर्वी आजारातून बरे झाले असाल किंवा डोकेदुखी, मायग्रेन यांसारख्या समस्या असल्यास उपवास करणे टाळावे.


सम्बन्धित सामग्री







jaimaharashtranews-logo