Tuesday, July 02, 2024 08:31:08 AM

Narendra Modi
मोदींची रालोआच्या नेतेपदी निवड

रालोआने नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केली आहे. मोदींची नेतेपदी निवड करण्याच्या प्रस्तावावर २१ नेत्यांच्या सह्या आहेत.

मोदींची रालोआच्या नेतेपदी निवड

नवी दिल्ली : रालोआने नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केली आहे. मोदींची नेतेपदी निवड करण्याच्या प्रस्तावावर २१ नेत्यांच्या सह्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची वेळ मागितली आहे. मोदी ७ किंवा ८ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. 

रालोआला स्पष्ट बहुमत

सत्तास्थापनेसाठी २७२ खासदारांची आवश्यकता आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला २४० जागांवर विजय मिळाला. भाजपाच्या नेतृत्वातील रालोआने २९२ जागा जिंकल्या. यामुळे भाजपाच्या नेतृत्वातील रालोआने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या बहुमताच्या जोरावर नरेंद्र मोदी सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. 

लोकसभा निवडणूक निकाल २०२४
रालोआ २९२
भारतीय जनता पार्टी २४०
टीडीपी १६
जदयू १२

महत्त्वाच्या घडामोडी
१ मोदींनी मागितली राष्ट्रपतींची वेळ 
२ रालोआच्या बैठकीत मोदींची नेतेपदी निवड 
३ मोदी काळजीवाहू पंतप्रधान
४ नरेंद्र मोदींनी दिला पंतप्रधानपदाचा राजीनामा - ५ जून २०२४
५ लोकसभा निवडणूक निकाल जाहीर - ४ जून २०२४

        

सम्बन्धित सामग्री