Thursday, July 04, 2024 09:04:47 AM

Narendra Modi
मोदींकडे किती आहे संपत्ती ?

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीप्रधान देशाचे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असलेल्या मोदींकडे किती संपत्ती आहे असा प्रश्न सध्या समाजमाध्यमातून उपस्थित केला जात आहे.

मोदींकडे किती आहे संपत्ती

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी रविवार ९ जून २०२४ रोजी संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीप्रधान देशाचे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असलेल्या मोदींकडे किती संपत्ती आहे असा प्रश्न सध्या समाजमाध्यमातून उपस्थित केला जात आहे. या प्रश्नाचे उत्तर मोदींनी काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी भरलेल्या उमेदवारी अर्जातून जगजाहीर झाले आहे. 

मोदींकडे एकूण ३.०२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. याआधी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भरलेल्या उमेदवारी अर्जानुसार मोदींकडे २.५१ कोटी रुपये एवढी संपत्ती होती. तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भरलेल्या उमेदवारी अर्जानुसार मोदींकडे १.६६ कोटी रुपये एवढी संपत्ती होती. मोदींनी सोनं, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), सुरक्षा ठेव अर्थात फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) यात गुंतवणूक केली आहे.


सम्बन्धित सामग्री