Thursday, July 04, 2024 09:25:47 AM

caretaker
मोदी काळजीवाहू पंतप्रधान

राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदी यांचा राजीनामा स्वीकारला आणि त्यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली.

मोदी काळजीवाहू पंतप्रधान

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपाला २४० जागांवर विजय मिळाला. भाजपाच्या नेतृत्वातील रालोआने २९२ जागा जिंकल्या. यानंतर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची शेवटची बैठक घेतली. या बैठकीनंतर पंतप्रधानांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना राजीनामा दिला. राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदी यांचा राजीनामा स्वीकारला आणि त्यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सतरावी लोकसभा विसर्जित केली.


सम्बन्धित सामग्री