Friday, June 21, 2024 11:28:04 AM

Uddhav Comment
'सोडून गेलेल्यांना परत घेणार नाही'

सोडून गेलेल्यांना परत घेणार नाही, असे उद्धव म्हणाले. ते लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईत झालेल्या मविआ नेत्यांच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

सोडून गेलेल्यांना परत घेणार नाही

मुंबई : सोडून गेलेल्यांना परत घेणार नाही, असे उद्धव म्हणाले. ते लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईत झालेल्या मविआ नेत्यांच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकसभा निवडणुकीत राज्यात केलेल्या कामगिरीमुळे मविआमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता विधानसभा निवडणुकीतही मविआ छान कामगिरी करेल आणि राज्यात सत्तांतर करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

मविआ नेत्यांच्या पत्रकार परिषदेत कोणी कोणते मुद्दे मांडले ?

शिउबाठाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे

रालोआचे सरकार किती दिवस राहील याची खात्री नाही - उद्धव ठाकरे
केंद्रात मोदींचे नाही रालोआचे सरकार - उद्धव ठाकरे
मविआ म्हणून विधानसभेची निवडणूक लढवू - उद्धव ठाकरे
M फॅक्टरमध्ये मराठी येत नाही का ? - उद्धव ठाकरे
कित्येक कोटी लोकांनी भाजपाच्या विरोधात मतदान केलं - उद्धव ठाकरे
सर्व धर्मियांनी संविधान वाचवण्यासाठी मतदान केलं - उद्धव ठाकरे
लोकसभेत जनतेने धडा शिकवला आता विधानसभेच्यावेळीही शिकवेल - उद्धव ठाकरे
सहकाऱ्यांमुळे भाजपावर रडण्याची वेळ आली- उद्धव ठाकरे
भाजपा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये भिंत उभी करण्याच्या प्रयत्नात - उद्धव ठाकरे
सरकार आल्यानंतर गुजरातचं जे असेल ते त्यांना देऊ - उद्धव ठाकरे
केंद्र सरकारने सर्वांना समान न्याय दिला पाहिजे - उद्धव ठाकरे
सोडून गेलेल्यांना परत घेणार नाही - उद्धव ठाकरे

राशपचे अध्यक्ष शरद पवार

लोकांनी पाठिंबा दिला - शरद पवार
मोदींच्या जितक्या सभा, तितक्या आमच्या जागा - शरद पवार
महाराष्ट्रात सत्तेचा गैरवापर - शरद पवार
महाराष्ट्राने भाजपाचा पराभव केला - शरद पवार

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण

धार्मिक ध्रुवीकरण झाले - पृथ्वीराज चव्हाण
तपास यंत्रणांचा महाराष्ट्रात गैरवापर झाला - पृथ्वीराज चव्हाण
मविआ म्हणून विधानसभेची निवडणूक लढवू - पृथ्वीराज चव्हाण
महाराष्ट्रात सत्तांतर होणार - पृथ्वीराज चव्हाण


सम्बन्धित सामग्री