श्रीनगर : जम्मू - काश्मीरमध्ये विधानसभेसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान झाले. राज्यात पहिल्या टप्प्प्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५८.१९ टक्के मतदान झाले. निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे.
जम्मू - काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात डोडा, रामबन आणि किश्तवाड या तीन जिल्ह्यांतील आठ तसेच अनंतनाग, पुलवामा, शोपियां आणि कुलगाम या चार जिल्ह्यांतील सोळा मतदारसंघांमध्ये मतदान झाले. मुसलमानांनी कलम ३७० विरोधात मतदान केल्यामुळे पहिल्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी ५८ टक्क्यांपेक्षा जास्त झाली असल्याचे मत जम्मू - काश्मीरचे राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत.
जम्मू - काश्मीर विधानसभा
- काश्मीर विभाग - ४७ मतदारसंघ
- जम्मू विभाग - ४३ मतदारसंघ