Tuesday, September 17, 2024 09:05:42 AM

Nashik
नाशकात हिंदूंच्या मोर्चावर मुसलमानांचा हल्ला

नाशकात हिंदूंच्या मोर्चावर मुसलमानांनी हल्ला केला. यामुळे तणाव निर्माण झाला.

नाशकात हिंदूंच्या मोर्चावर मुसलमानांचा हल्ला

नाशिक : नाशकात हिंदूंच्या मोर्चावर मुसलमानांनी हल्ला केला. यामुळे तणाव निर्माण झाला.

नेमके घडले काय ?

बांगलादेशमध्ये हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने ठोस पावले उचलावी या मागणीसाठी शुक्रवारी नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. हिंदू समाजातील अनेकांनी बंदच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आपापली दुकानं बंद ठेवली. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नाशिकमध्ये हिंदूंनी एक मोर्चा काढला. हा मोर्चा पुढे सरकत असताना भद्रकाली या मुसलमानबहुल भागात दुकानं सुरू असल्याचे आढळले. बंदला पाठिंबा देण्यासाठी दुकानं बंद ठेवावी अशी मागणी करत काही कार्यकर्ते गेले असताना दुकानदार आणि कार्यकर्ते यांच्यात वाद झाला. तणाव वाढला. यानंतर मुसलमानांनी मोर्चा काढला. मोठ्या संख्येने मुसलमान रस्त्यावर आले. मुसलमानांनी हिंदूंवर हल्ला केला. यामुळे तणाव वाढला अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

नाशिकमधील घडामोडींची माहिती मिळताच भाजपा आमदार नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली. भाईचारा फक्त हिंदूंनीच पाळायचा का ? असा जळजळीत सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. 

  1. सकल हिंदू समाजाकडून बंदची हाक देण्यात आली होती
  2. बांगलादेशातल्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात मोर्चा नियोजित 
  3. भद्रकाली परिसरात दुकाने मुसलमानांनी बंद केली नाहीत 
  4. मुसलमानांनी दुकाने बंद न केल्यामुळे आंदोलकांनी विनंती केली 
  5. नमाज पठण करून रस्त्यावर उतरलेल्या जमावाने आंदोलकांवर हल्ला केला. 
  6. मुसलमानांच्या हल्ल्यात आंदोलक जखमी झाले. 
  7. संघर्षात वाहनांची तोडफोड करण्यात, भाजपा आमदाराचे फलक फाडले 



           

सम्बन्धित सामग्री