Thursday, November 21, 2024 03:19:56 PM

Munde
मुंडे भाऊ बहीण एकाच मंचावर

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील भगवान गड येथे भाजपाच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे हे भाऊ बहीण एकाच मंचावर दिसणार आहेत. दोन्ही नेते नागरिकांना मार्गदर्शन करणार आहे

मुंडे भाऊ बहीण एकाच मंचावर

परळी वैजनाथ : दसरा मेळाव्याच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील भगवान गड येथे भाजपाच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे हे भाऊ बहीण एकाच मंचावर दिसणार आहेत. दोन्ही नेते नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. 

दरवर्षी दसरा मेळाव्याला भगवान गड येथे पंकजा मुंडे सभा घेतात. या सभेला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे भाऊ बहीण एकाच मंचावर दिसतील. 

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने अलिकडेच महाराष्ट्रातील १५ जाती - उपजातींचा समावेश केंद्रीय सुचीत केला. हा निर्णय झाल्यानंतर भगवान गडावर मेळावा होत आहे. लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर आरक्षणाशी संबंधित विषयांवर तसेच राजकीय मुद्यांवर मुंडे भाऊ बहीण काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा निर्णय

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने अलिकडेच महाराष्ट्रातील १५ जाती - उपजातींचा समावेश केंद्रीय सुचीत केला. राज्य सुचीतील क. २२० मध्ये अंतर्भाव असलेल्या बडगुजर, सुर्यवंशी गुजर, लेवे गुजर, रेवे गुजर, व रेवा गुजर या जातींचा अन्य मागासवर्गीयांच्या केंद्रीय सुचीमध्ये नव्याने समावेश करण्यास आयोगाने मान्यता दिली तसेच राज्य सुचीच्या क. २१६ मधील पोवार, भोयर आणि पवार अशी स्वतंत्र नोंद घेत आयोगाने या ओबीसी जातींचा केंद्रीय सुचीमध्ये समावेश करण्यास अनुमती दिली आहे. कापेवार, मुन्नर कापेवार, मुन्नर कापू, तेलंगा, तेलंगी, पेंटारेड्डी, बुकेकरी या बेलदार जातीच्या उपजातींचा राज्य सुचीतील क. १८९ मध्ये समावेश असलेल्या जातींचा राज्य सरकारच्या शिफारसीनुसार आयोगाने नव्याने सुधारणा करीत केंद्रीय सुचीमध्ये समावेश करण्यास मान्यता दिली आहे. याबरोबरच राज्य सुचीतील क २६२ अंतर्गत असलेल्या लोध, लोधा व लोधी आणि क २६३ मध्ये समावेश असलेल्या डांगरी या जातीचा सुध्दा राज्य सरकारच्या शिफारशीनुसार इतर मागासवर्गीयांच्या केंद्रीय सुचीमध्ये समावेशास आयोगाने हिरवा झेंडा दाखविला आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo